आजचा युवक आणि माझा दृष्टिकोन

तारुण्य! ज्वलंत धमन्यांचं अविरत स्पंदन !निसर्गानं मानवाला दिलेला सर्वश्रेष्ठ वर !जीवनाच्या नगरीतील एकमेव राजमार्ग !निसर्गाच्या साम्राज्यातला वसंत! मनाच्या मयूराच पूर्ण पसरलेला पसारा! विश्वकर्त्याच्या अविरत धावणाऱ्या रथातील सर्वात मोठा घोडा! माणसांन मानानं मिळवायचा काळ! काहीतरी मिळवायचा काळ! शक्तीचा व स्फूर्तीचा काळ! आपण खऱ्या अर्थानं काहीतरी करावं, असं वाटणारा उमेदीचा काळ! दूरवर क्षितिजावर टेकलेल्या आकाशाच्या पलीकडं पाहण्याची तारुण्याची दृष्टी असते, सामर्थ्य असते! जे जे गतिमान ,प्रकाशमान त्याच्याकडे त्याची ओढ असते जे जे अशक्य असते, असे वाटते तेथे शक्य करून दाखवण्याची त्याची उर्मी असते .आजचा युवकही याला अपवाद नाही.

अनंत आमची ध्येय असते अनंत अन आशा |

किनारा तुला पामराला ||

भारतातील आजच्या युवकाबद्दल असणारा माझा दृष्टिकोन वेगळा आहे .आजचा युवक खरोखरच ध्येयप्राप्तीसाठी आसुसलेला आहे .तो शिक्षण अगदी तन्मयतेने घेतो, पण जर आज आपण आजची शैक्षणिक पद्धती पाहिली तर ती फक्त दिसायला चांगली आहे ,उत्कृष्ट आहे तिची समाजात चाललेली अंमलबजावणी मात्र चांगली होत नसलेली आपणास दिसून येते व या आजच्या शिक्षण पद्धतीत आणि तिच्या अंमलबजावणीतच युवक असंतोषाचे मूळ दडलेले आहे .आजचे शैक्षणिक क्षेत्रातील अफरातफर, वशिलेबाजी पाहिल्यावर आजचे तारुण्य उफाळून उठते संतप्त होते यात गैर ते काय? आज एखादा तरुण शिकलेला जरी असेल पण त्याच्याजवळ वशिला नसेल तर त्याला योग्य तरी ची नोकरी मिळत नाही याउलट एखादा जरी अंगठेबहादूर असेल पण त्याच्याजवळ भक्कम वशिला व पैसा असेल तर त्याला नोकरी विनासायास मिळते ही जी घटना समाजात सर्रास चाललेली आहे त्यामुळे युवक बीथरतात.आणि दंगली करतात. कॉलेजवर मोर्चे नेतात,संप करणे ,लाठीमार करणे इत्यादी गोष्टी करण्यास युवक तयार होतात कारण युवकांचे रक्त हे तरुण असते मग यात आपण यांना दोष द्यायचा का? मुळीच नाही |

भारत हा जरी गरिबांचा श्रीमंत देश आहे असे म्हटले जाते पण तरीही या देशातील एक अब्जातील जवळजवळ 60 टक्के ते 70 टक्के लोकसंख्या ही 18 ते 30 या वयोगटातील आहे म्हणजेच भारतातील युवाशक्ती ही अफाट आहे पण तिचा वापर आपण योग्य करतो आहोत का? आज अनेक युवक आपल्या देशात शिक्षण घेतात व इतर देशात जातात ते का जातात ?याचा आपण कधी विचार केला आहे का ?आज जगात जे अनेक शोध लागतात त्या शोधामागे असणारे शास्त्रज्ञ हे बहुतेक करून भारतीय वंशाचे असतात मग ते आपल्या देशात का राहत नाही? कारण आपल्या देशात त्यांना मिळणाऱ्या सुविधा ,मान, प्रतिष्ठा ही इतर देशाच्या तुलनेने कमी असते याउलट आपल्या देशातील राज्यकर्त्यांना मोठ्या सन्मानाची वागणूक दिली जाते .

आता राजकारणातच पहा ना! आपण आजचा युवक बेशिस्त आहे मोठ्यांचा आदर करत नाही असे म्हणतो पण या राजकारणात बडे लोक आजच्या या युवा पिढीचा भरघोस आश्वासने, आमिषे दाखवून निवडून येण्यासाठी वापर करून घेतात पण ते जेव्हा निवडून येतात तेव्हा मात्र ते या युवकांकडे पाठ फिरवतात मग मात्र ही युवा पिढी चिडते व तिचा संयम सुटतो यातूनच दंगली ,जाळपोळ इत्यादी प्रकार घडतात .मग यात आपण युवकांना दोष द्यायचा का? मी तर या युवकांनी कवी दिनकरांनी सांगितल्याप्रमाणे सांगेन की

शासन के यंत्रोपर रखो निगाहे

छिपे अगर हे दोष, उन्हे खोलते चलो

प्रजातंग का क्षार ,प्रजा की वाणी हे

जो कुछ हो बोलला, अभय बोलते चलो ||

आजच्या जीवनात बेकारी हा युवकांना भेडसावणारा मोठा यक्षप्रश्न आहे .प्रत्येकाला वाटते की आपल्याला नोकरी मिळावी आणि तीही कमी कष्टाची आणि लठ्ठपगाराची | पण माझ्या युवा मित्रांना मी सांगेन ” नो कल्चर विदाऊट ऍग्रीकल्चर “आपल्याला नोकरी मिळाली नाही म्हणून आपण हात पाय गाळायची गरज नाही तर आपला देश शेतीप्रधान आहे म्हणूनच आपण ते करण्यात काहीही गैर नाही पण याबाबत त्यांना समजून सांगताना त्यात प्रेम असले पाहिजे थोर पेस्टोलॉजी म्हणतो,

discipline must be boost in love

must be control by love

याप्रमाणे आपण जर त्यांना प्रेमाने समजून सांगितले तर ते नक्की उपयोगी पडेल

आणि फक्त तुमच्यासाठी माझ्या युवक मित्रांनो देश बांधवांनो व मानवतेच्या पुजाऱ्यांनो,

स्वागताचे सुर माझे स्वागताला उमटले

नव परिवर्तनाची ,नवरचनेची …..आणि उज्वल भविष्याची सुरुवात करताना विरोधाच्या लाटा आणि वादळे येणारच आहे हे गृहीत धरून मोडलेले पुन्हा जोडण्यासाठी मन आणि मनगट माझ्या युवक मित्रांचे असावे इतकीच प्रार्थना मला तर विधात्याकडे करावयाची आहे.

तुमच्यासाठी अजून बरच काही……

टिपणी करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत