कुणाच्या इतक्याही जवळ जाऊ नये
की आपल्याला त्याची सवय व्हावी
तडकलेच जर हृदय कधी
जोडताना असह्य वेदना व्हावी
बोलताना कुणाचे नाव इतक्याही वेळेस येऊ नये
की ते नाव जड व्हावे
एक दिवस अचानक त्या नावाचे
येणे बंद व्हावे
स्वप्नात कुणाला असंही बघू नये
की आधाराचे त्याचे हात असावे
तुटलच जर स्वप्न अचानक
हातात आपल्या काहीच नसावे
कोणाला इतकाही वेळ देऊ नये
की आपल्यालाच क्षणाक्षणाला त्याचा अधिकार व्हावा
एक दिवस आरशासमोर आपणास
आपलाच चेहरा परका व्हावा
कुणाची इतकी ही ओढ नसावी
की पदोपदी आपण त्याची वाट बघावी
त्याची वाट बघता बघता
आपलीच वाट दिशावी व्हावी
कुणाची इतके हे ऐकू नये
की कानात त्याच्याच शब्दाचा आवाज व्हावा
आपल्या ओठातून मग अचानक
त्याच्याच शब्दाचा उच्चार व्हावा
कुणाची अशी ही सोबत असू नये
किस प्रत्येक स्पंदनात ती जाणवावी
ती साथ गमावण्याच्या केवळ भीतीने
डोळ्यात खळकण असवं जमावी
कुणाला इतकाही माझा /माझी म्हणूनही
की त्याचे मी पण आपण विसरून जावे
त्या संभ्रमातून त्याने आपल्याला
ठेच देऊन जागे करावे
पण ….पण …. पण…..
कुणाच्या इतक्याही दूर जाऊ नये
की सोबत सावली खेरीज काहीच नसावे
दूर -दूर आवाज दिला तरी
शब्द बिचारे जागीच घुमावे


