मनुष्य अमर झाला तर

मरण कल्पनेशी थांबे ,तर्क जाणत्यांचा

पराधीन आहे जगती, पुत्र मानवाचा|

जन्मजात मृत्यू त्याला ठेवलेला मागुती_”

या चिरंतन सत्यामुळे कवी ग, दि.माडगूळकरांनी मानवाला पराधीन म्हटलं पण समाजातून माणूस अमर झाला तर ?खरंच काय मजा येईल, मृत्यूचाच मृत्यू झाला तर …?…तर काय ?माणसाची पराधीनता संपून जाऊन जीवन मुक्त होऊन नाचेल ‘वासांसि जीर्णनी यश विधय …’या गीतेतील ओळी निरर्थकच !कुणी भावुक कवी ‘लागले नेत्र रे पैलतीरी’ म्हणणारच नाही ‘याचसाठी केला होता अट्टाहास ‘शेवटचा दिस गोड व्हावा, बदलून घ्यावं लागेल आणि ‘आम्ही जातो आमच्या गावा ‘ऐकायला कसेतरीच वाटेल काल्पनिक स्वर्गात जाण्याची गरजच नाही ,तोच खाली पृथ्वीवर वस्तीला येईल आणि देवाप्रमाणे अखिल मानव जात अमरत्वाला पोहोचेल.

भूतकाळातील सत्यासत्यता ‘हा सूर्य हा जयद्रथ’ न्यायाने पारखता येईल .मरणाच्या भीतीने दुःखी झालेले जीवन प्रसन्न होईल .सारे महामानव ,विचारवंत ,वैज्ञानिक ,कलावंत यांना कार्य अर्धवट टाकून त्याच्याकडे जावे लागणार नाही.

इथं राहून त्याच्या कार्याची फळ ‘याच देही याच डोळा ‘बघायला मिळतील .लढाई हा घातक प्रकार न राहता फुटबॉल मॅच सारखा मनोरंजकाचा कार्यक्रम होईल .सारी शस्त्र ,आयुध कुचकामीच ठरतील .आत्महत्या हा भ्याडपणाचा, तर खून हा प्रकारच बंद होईल .रेल्वेच्या रुळावर मान ठेवून त्यावरून गाडी गेल्यावर ताट मानेने पुन्हा माणूस उठेल ,तर टासन तास विहिरीच्या तळाशी राहून यमराज कुठे सापडत नाहीत हो ,म्हणत तो बाहेर येऊन अंग पुसेल. जीवनातले आनंद अर्धवट टाकून भरल्या ताटावरून उठावं लागणार नाही .इथे एक सुखांचा मनःपूर्वक आस्वाद घेता येईल भीती लिहून पळून जाईल. अग्निदिव्य हा पोर खेळ होईल .सुरंगाच्या स्फोटातही माणूस निवांत कादंबरी वाचत बसेल. विष ,विषारी औषध मोडीत निघतील .फाशीची शिक्षा म्हणजे काय? याची तात्विक चर्चा चालेल वट पौर्णिमेला वड विश्रांती घेतील. 84 लक्ष जन्माचा फेरा करावाच लागणार नाही .मरण जाऊन अमरत्वाची कवच कुंडलधारी कर्ण होतील सारे |

पण …पण माणूस सुखी होईल का ?जीवन मुक्त होऊन नाचेल खरे पण नंतर ते थैमान घालेल प्रसन्न असणारे जीवन नंतर भेसूर, विकट हसेल .मृत्यूमुळे जीवनाला चव आहे अमर पणा आरोग्य देईल ही खात्री आहे का? मग व्याधीपासून सोडवणार कोण? वार्धक्य येणारच मग गल्लीतगात्र होऊन न संपणारा जीवन कुठपर्यंत जगायचं…? दुःखी ,रोगी ,वृद्ध लोकांनी पृथ्वी भरून जाईल .पिढ्यांचे संघर्ष विकोपाला जातील. मृत्यू आहे म्हणून देवावर श्रद्धा आहे या अमर पट्ट्याने देवाची अस्तित्व धोक्यात येईल . दृष्टकृत्यांना ऊत येईल .विचारवंत ,कलावंत राहतील तसे निर्बुद्धही !सज्जन तसे दुर्जन पण ,शहाणे तसे वेडे सुद्धा !…प्रचंड संख्येला पोसताना पृथ्वी रडेल .पूर्णविराम नसलेल्या गडकर्‍यांना लांबलचक वाफ यांनी दमछाक व्हावी तसं आयुष्य होईल .”मरणात खरोखरच जग जगते ‘जाऊन ‘जगण्यात खरोखरच जग मरते “असे होईल.

आज माणूस मेला तरी किर्तीरूपाने जिवंत राहतो .म्हणूनच आजही आपण राम ,कृष्ण, राणा प्रताप ,शिवाजी ,नेहरू ,गांधी ,टिळक यांना विसरलेलो नाही .माणसाने अमरत्व मिळवायचेच असेल तर ते असेच मिळवले पाहिजे .जिवंत राहून मरण शोधत फिरण्यापेक्षा मरण पावून कीर्ती रूपाने जिवंत राहणेच बरे.

अजून बरच काही….

टिपणी करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत