जेव्हा तुला अनंत अडचण येतील
जेव्हा तुला तुझा मार्ग अत्यंत खडतर असेल
व तुला अपेक्षा जास्त असते व तुला पाहिजे तसे यश मिळत नसेल
जेव्हा तुला हसायचे असेल,
परंतु रडावे लागत असेल
जेव्हा तुला चिंतेने त्रासलेले असेल-
तेव्हा तू थोडा विसावा घे ,
पण माघार घेऊ नकोस
जीवन चढउतारांनी भरलेले आहे
जेव्हा तू काही मिळवण्यासाठी ,
परिश्रम करत असशील,
तेव्हा कधी कधी अपयशही येईल
पण तू प्रयत्न करणे सोडलेच नाहीस
तर तुझा विजय निश्चित आहे
………… आता जरी तुला ,
तुझी प्रगती कमी वाटली तरी,
तरीही तू पुढच्याच प्रयत्नात
यशस्वी होऊ शकतोस
“यश अपयशाची दुसरी बाजू आहे”
जेव्हा मनातल्या बऱ्याचशा
शंकामुळे आपल्याला
यशाची शक्यता कमी दिसते….
तेव्हा ,यशापासून आपण नेमके
किती दूर आहोत ,
हे आपण खरे सांगू शकत नाही
यश खूप दूर आहे असे
जेव्हा आपल्याला वाटते
तेव्हा तू प्रतिकूल परिस्थितीशी
झगडत असशील
तेव्हा ,खरेच प्रयत्न करणे मात्र सोडू नकोस
प्रयत्नांनीच तुला थकवा येईल
तेव्हा थोडा “विसावा “घे
पण माघार घेऊ नकोस
अजिबात माघार घेऊ नकोस….
येणाऱ्या सर्व आव्हानासाठी सज्ज रहा
त्यांना खंबीर मानाने सामोरे जा
ऐरण झालास तर घाव सोस…..
हातोडा झाला असता घाव घाल!
_डॉ. अब्दुल कलाम
तुमच्यासाठी अजून बरच काही…….












