वडील एक कृतज्ञ संस्मरण

आई घराचं मांगल्य असते घराच्या अस्तित्वाला खरं म्हणजे बापाला खरंच आम्ही कधी समजून घेतलेलं आहे का ?वडिलांना महत्त्व असूनही त्यांच्याविषयी जास्त लिहिलं जात नाही बोललं जात नाही कोणत्याही व्याख्याता आईविषयी बोलत राहतो .संत महात्म्यानी आईच महत्व अधिक सांगितलेलं आहे .चांगल्या गोष्टींना आईचीच उपमा दिली जाते पण बापाविषयी कोठेच फारसं बोललं जात नाही .काही लोकांनी बाप रेखाटला तोही तापट ,व्यसनी, मारझोड करणारा समाजात एक दोन टक्के बाप असे असतील पण चांगल्या वडिलांबद्दल काय ?

आईकडे अश्रूची पाट असतात पण बापाकडे संयमाचे घाट असतात. आई रडून मोकळी होते पण सांत्वन वडिलांना करावं लागतं आणि रडणाऱ्या पेक्षा सांत्वन करणाऱ्याचा जास्त ताण पडतो. कारण ज्योतीपेक्षा समईच जास्त तापते ना! पण श्रेय नेहमीच ज्योतीलाच मिळत राहते !रोजच्या जेवणाची सोय करणारे आई आमच्या लक्षात राहते पण आयुष्याची शिदोरी ची सोय करणारा बाप आम्ही किती सहज विसरून जातो. सर्वांसमोर आई मोकळेपणाने रडू शकते पण रात्री उशीर तोंड खूप सुंदर तो बाप असतो .आई रडते पण वडिलांना रडता येत नाही स्वतःचा बाप वारला तरी त्यांना रडता येत नाही कारण छोट्या भावंडांना जपायचं असतं .आई गेली तरी रडता येत नाही कारण बहिणींचा आधार व्हायचं असतं .पत्नी अर्ध्यावरच साथ सोडून गेली तरी पोरांसाठी अश्रूंना आवर घालावा लागतो

जिजाबाईंनी शिवाजी घडवला असं अवश्य म्हणा पण त्याचवेळी शहाजीराजांची ओढाताण लक्षात घ्यावी. देवकीच, यशोदाचं कौतुक अवश्य करावं ,पण पुरातून पोराला डोक्यावर घेऊन जाणारा वासुदेव सुद्धा लक्षात ठेवावा .राम हा कौशल्येचा पुत्र अवश्य असेल पण पुत्र वियोगाने तडफडून मरण पावला तो पिता दशरथ होता .

वडिलांच्या टाचा झिजलेल्या चपलांकडे बघितलं की त्यांचे प्रेम कळते त्यांचे फाटके बनियन बघितलं की कळतं ,”आमच्या नशिबाची भूक भूक भूक त्यांच्या बनियानला पडलेत” त्यांचा दाढी वाढलेला चेहरा त्यांची काटकसर दाखवतो. मुलीला कपडे ,मुलाला कपडे ,पण स्वतः मात्र जुनीच पॅन्ट वापरतील मुलगा सलून मध्ये वीस पंचवीस रुपये खर्च करतो. मुलगी पार्लरमध्ये खर्च करते पण त्याच घरातला बाप दाढीचा साबण संपला म्हणून अंघोळीच्या साबणाने दाढी करतो .अनेकदा तर नुसतं पाणी लावून दाढी करतो बाप आजारी पडला तरी लागलीच दवाखान्यात जात नाही .तो आजारांना घाबरत नाही पण डॉक्टर एखादा महिना आराम करायला लावतील याची त्याला भीती वाटते .कारण पोरीचं लग्न, पोराचं शिक्षण बाकी असतं घरात उत्पन्नाचं दुसरं साधन नसतं ऐपत नसते, तरीही मुलाला मेडिकल, इंजिनिअरिंग मध्ये प्रवेश मिळून दिला जातो .ओढाताण सहन करून मुलाला दर महिन्याला पैसे पाठवले जातात ,पण सर्वच नसले तरी काही मुलं अशीही असतात की जे तारखेला पैसे येतात मित्रांना परमिट रूममध्ये पार्ट्या देतात .आणि ज्या बापाने पैसे पाठवले त्यांची टिंगल करतात .एकमेकांच्या बाबांच्या नावाने एकमेकांना हाका मारतात

ज्या घरात बाप आहे त्या घरात कोणीही वाईट नजरेने बघू शकत नाही. कारण घरातला करता जिवंत असतो तो जरी काहीही करत नसला, तरीही तो त्या पदावर असतो आणि घरच्यांचं कर्म बघत असतो ;संभाळत असतो. कोणाचा मुलगा होणं टाळता येत नाही पण बाप होणं टाळता येतो आईच्या असण्याला अथवा आई होण्याच्या बापामुळेच अर्थ असतो .

कोणत्याही परीक्षेचा निकाल लागल्यावर आहे जवळची वाटते. कारण ती जवळ घेते, कवटाळते ,कौतुक करते, पण गुपचूप जाऊन पेढ्यांचा पुडा आणणारा बाप कोणाच्या लक्षात येत नाही. पहिलं पहिलटकरणीचं खूप कौतुक करते, पण हॉस्पिटलच्या आवारात अस्वस्थपणे वावरणाऱ्या त्या बाळाच्या बापाची कोणीही दखल घेत नाही .

चटका बसला, ठेच लागली, फटका बसला तर ‘आई ग ‘हा शब्द तोंडातून बाहेर पडतो, पण रस्ता पार करताना एखादा ट्रक जवळ येऊन ब्रेक लावतो तेव्हा “बापरे”! हाच शब्द बाहेर पडतो .छोट्या संकटासाठी आई चालते पण मोठी मोठी वादळ पिताना बापच आठवतो .काय पटते ना ?

कोणत्याही मंगल प्रसंगी घरातील सर्वजण जातात, पण मयताच्या प्रसंगी बापालाच जावं लागतं .कोणताही बाप श्रीमंत मुलीच्या घरी जास्त जात नसतो, पण गरीब लेकीच्या घरी उभ्या उभ्या का होईना चक्कर मारतो .तरुण मुलगा उशिरा घरी येतो तेव्हा बापच जागा असतो. मुलीच्या नोकरीसाठी साहेबांपुढे लाचार होणारा बाप ,मुलीच्या विवाहासाठी बर उंबरठा झिजवणारा बाप ,घरच्यांसाठी स्वतःच्या व्यथा दडपणारा बाप खरंच किती ग्रेट असतो ना ?

वडिलांचं महत्त्व कोणाला कळलं ?

लहानपणी वडील गेल्यावर अनेक जबाबदाऱ्या खूप लवकर पेलाव्या लागतात .त्यांना एकेका वस्तूसाठी तरसाव लागतं .वडिलांना खऱ्या अर्थाने समजून घेते ती म्हणजे त्या घरातले मुलगी

सासरी गेलेल्या अथवा घरातून दूर असलेल्या मुलीला बापाशी फोनवर बोलताना बापाचा बदललेला आवाज क्षणात कळतो. ती अनेक प्रश्न विचारते .

मुलगी आपल्या इच्छा बाजूला ठेवून वडील म्हणतील तेव्हा विवाहाच्या बोलल्यावर चढते .

मुलगी बापाला जाणते, जपते इतरांनी सुद्धा असंच आपल्याला जाणव हीच बापाची किमान इच्छा असते

अजून बरच काय…

टिपणी करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत