संध्याकाळ आली की माझं असं होतं
तुझी आठवण दाटून येते आणि मन पिस होत
माणसांमध्ये असून सुद्धा मी
अगदी एकटा असतो
अळवावरचा थेंब जसा
त्यावर बसून वेगळा असतो
मला व्याकुळलेला पाहून
सूर्य क्षणभर रेंगाळतो
आणि इंद्रधनू होऊन
सात रंगात रेंगाळतो
आभाळ झुकत पश्चिमेला आणि
थोडी धुंद हवा
वाऱ्यावरती लहरत येतो तुझ्या
आठवणीचा थवा
एकाएकी दरवळू उठतो
रातरणी येते फुलून
तू आता येतेयेस याची
मला वाटते खूण
पैंजणाची छुम छुम आणि
काना मागे तुझे श्वास चोहीकडे
भरून येतात घमघममणारे
तुझे भास
अजून बरच काही तुमच्यासाठी…






