शब्दांच्याच मोळ्या अनेक
भावनांना नाही थारा
कोलाहाल पुरता शब्दांचा
नाही पाऊस नाही वारा
शाईने भरलेले पेन नकोत
हवे उदात्तेने भरलेले मन
कविता म्हणजे खेळ नाही
कविता म्हणजे भावनांचे वन
कोंदलेले शब्दांचे गाठोडे
जमवून शेवटी तुच्छ यमक
भारावून टाकणे वाचकाला
हेच कवीच्या यशाची गमक!
अजूनही बरच काही….






