कधी न रडावे आयुष्यात
संकटात ही सदा असावे
कितीही लागो कष्ट तरीही
समाधान ते नेहमी ठेवावे
जिद्द ,ध्येय ,धाडस, हिम्मत ,
अंगी आपल्या असे भीनावे
एखाद्या तरी क्षेत्रात आपले
नाव उच्च पदी ठेवावे
साहित्याचा ध्यास धरावा
पुस्तकाचा नाद लागावा
अभ्यासातला प्रत्येक विचार
मनी आपल्यास रुजवन टाकावा
तिखट असो वा गोड असो
नेहमी आनंदाने कवटळावे
हात करावे इतके उंच की
आकाशाला स्पर्श करावे


