” पु.ल. चां स्पर्श होताच दुःखी पळाली
नवा सूर आनंदयात्रा मिळाली
निराशेतून माणसे मुक्त झाली
जगू लागली हास्यगंगेत न्हाली”.
ज्येष्ठ कवी मंगेश पाडगावकर यांच्या काव्यरूपी भावना कोणाची ओळख करून देतात? अर्थातच महाराष्ट्राच्या लाडक्या व्यक्तिमत्त्वाची एक महान ,आनंदी वाटसरूची जो या जीवन प्रवासात हसत जगला आणि मृत्यूलाही हसत हसत कवेत घेतले. जनमानसांना खळखळून हसविणारे पु.ल. देशपांडे
८ नोव्हेंबर १९१९ हा पु.लं.चा जन्मदिवस ,खरं तर हा दिवस म्हणजे मराठी साहित्यातील पौर्णिमा होय कारण पु.लं.चे व्यक्तिमत्व चंद्रापेक्षा कमी नव्हते आपल्या लेखन शैलीतून विनोद बुद्धीतून त्यांनी इतरांना खळखळून हसविले. त्यांचे विनोद कपटाने कोणाला उद्देशून नसतात .चार्ली चापलीन चा खरा वारसदार म्हणून पु.ल.चे वर्णन केले तर ती अतिशयोक्ती ठरणार नाही.
फटाफट हशे फोडून टाळ्या पु.लं.चा हात कोणीच धरू शकणार नाही .निर्मळ आनंद त्यांच्या विनोदातून मिळेल .घरातील चार पिढ्या एकत्र बसून त्यांचा विनोदाचा आस्वाद घेऊ शकत. पु.ल.चा विनोद कमरेखाखालचा, वचकरे काढणारा कधीच नव्हता. जबरदस्त निरीक्षण शक्तीमुळे पु.लं. सहज विनोदी कोटी करत .त्यामुळे हे विनोद लोकांमध्ये वाऱ्यासारखे पसरत .या कोट्या विनोदातून पु.ल. स्वतःचा व सुनिता बईंचा अपवाद करीत नसत.
‘इंद्रायणी काठी देवाची आळंदी’ हे अजरामर गीत असलेल्या ‘गुळाचा गणपती ‘हा चित्रपट फारसा चालला नाही. या चित्रपटाची जाहिरात सबकुछ पूल अशी करण्यात आली होती या संदर्भात पुलंचे भाष्य होते-
“सबकुछ पु.ल. म्हणजे प्रेक्षकही पु.ल.च !”
मराठी भाषेवर त्यांचे ज्ञानेश्वरा इतकेच प्रेम, मराठी भाषा संदीग्ध करण्याबाबत पु.ल. नाराजी व्यक्त करताना म्हणत, सोस सोर्स चे भाषांतर म्हणून सूत्र आले उद्या बायकोने सांगितले असे म्हणण्यापेक्षा आमच्या मंगळसूत्रांनी सांगितले असे म्हटले तर?
पु.ल .ची कर्मभूमी ‘पुणे’ पुण्यावर अतिशय प्रेम पुण्यातच त्यांचं आयुष्य गेलं पुण्याचे वर्णन करताना ते म्हणत,
“मी राहतो पुण्यात,
म्हणजे विद्वत्तेच्या ‘ठाण्या’ त
इथल्या मंडईही विद्यापीठ आहे
आणि विद्यापीठाची मंडई झाली आहे”
सुसंगतीची ओढ असते म्हणून विनोदी लेखक विसंगती दाखवतो म्हणूनच पुण्यातील माणसाच्या सुसंगत आचरणासाठी विसंगती दाखवताना ते म्हणतात,
“बोलणे हा इथला धर्म आहे
आणि ऐकणे हा दानधर्म आहे
म्हणून वक्ते उपदेश करतात
आणि श्रोते उपकार करतात”
पु.ल.च्या साहित्याविषयी बोलावे तेवढे थोडेच आहे. खोगीर भरती ,नुसती उठाठेव,बटाट्याची चाळ, असा मी असा मी ,हसवणूक यासारखे विनोदी लेख सर्वांच्या चेहऱ्यावर वेगळीच झळाळी आणतात .गणगोत ,व्यक्ती आणि वल्ली ही त्यांची प्रसिद्ध व्यक्तीचित्रे. त्यांचा विनोद हसता हसता अंतर्मुख करून जातो. पु.लं.च्या साहित्यात प्रवेश करताना आपण विनोदाच्या फुल बागेतच प्रवेश करतो यात शंका नाही पण या या बागेतील एक फुलवात आपल्या जीवनाच्या मूलभूत मूल्यांकडे संघर्षाकडे घेऊन जाते.
पु. ल.जगातील देशोदेशी हिंडले पण त्यांच्या मनातील मराठीपण कधीच मावळले नाही आणि जगाच्या बाजारात वावरले पण त्यांच्या काळजातील बुद्ध कधीच हरवला नाही .नियतीच्या अगदी 18 हातांनी पु.लं.ची मूर्ती घडवली होती. ते एक उत्तम रसिक होते, मर्मवादी ,आस्वादक, चतुरवस्त्र वाचक ,गप्पीष्ट ,संपादक, शैलीकारक, लेखक, रसाळ व्यक्ती होते. त्यांचे शब्द हास्यरसात डुंबून येत खरे पण त्या मागच्या आशयाला काही भाव गंभीर अशी डूब असे. महाराष्ट्राने त्यामुळेच त्यांच्यावर प्रेम केले.
पु.लं.ना यातील अगणित पुरस्कार मिळाले पण अवघ्या महाराष्ट्राचा लाडका व्यक्तिमत्व हा त्यांच्या खरा सन्मान होय. पूर्ण कर्तुत्वाचा उत्तुंग शिखरावर पोहोचूनही ते माणुसकी विसरले नाही. त्यांना माणसात राहणे माणसात मिसळणे जास्तच आवडे.
“आकाशाएवढी उंची ज्याची
त्यांनी थोडे खाली यावे
मातीत ज्यांचे पाय रोवले
त्यांना वर उचलून घ्यावे”
या उक्तीचे उत्तम उदाहरण म्हणजे पु.लं.चे जीवन. मनुष्याला दुःख सागरातून बाहेर काढून आता हवी तो शक परमेश्वराला मनातील दुःखाची पोकळी भरून काढण्यासाठी तिघांच दिगंताच्या प्रवासाला निघून गेला .मराठी माणसाच्या डोळ्यातून अश्रूतून एकच सूर उमटतो आहे.
“कुठे हुडकावी, आता फुलाने गंधाची जागा
माहेरच्या मुख्य खिन्न वनवासी बागा
विनोदही विदुरह मूळ व्यथेचा विधाता
हसणे हसविणे दुःखाचीच कृतज्ञता”
पु.ल. म्हणजे केवळ कल्पनेच्या भराऱ्या नव्हे मनोरंजनाच्या काठ्या नाहीत तर ती खरीखुरी वास्तवता!
“माझ्या ओठांवरील थरथरे प्रार्थना एकच ही
व्हावे माझ्या कधी न भगवान हातुनी कर्मनीच
श्रद्धा राहू हृदयी असू दे तवस्मृति देवराज
चिंतेचे नाकीमवी मततेनात केव्हाही काच”
प्रभूपाशी अशी धीर गंभीर प्रार्थना करणारा आणि माणसाचे जीवन म्हणजे जळती मेणबत्ती स्वतः जळून इतरांना प्रकाश देणे हेच त्याचे कार्य ,असे जीवनाचे उदात्त्य ध्येय बाळगणारा आधुनिक महाराष्ट्रातील लेखक महाराष्ट्राच्या मराठी साहित्य प्रांगणातील ताजमहल म्हणजे पु .ल. देशपांडे होय.
साहित्य व समाज या एकच नाण्याच्या दोन बाजू आहेत .एक बाजू कोरी असली तरी त्या नाण्याला काय किंमत ?हा विवेक त्यांच्याजवळ असल्यामुळे शब्दबद्ध केलेली व्यक्तीचित्रे ही अस्सल जिवंत वाटतात .पु.लं.चे साहित्य विनोदी आहे. पु.ल.चे साहित्य जरी समाज जीवनाशी समरस होणारी आहे तरी पु.ल. नुसतेच वाचून समजणे कठीण, समजलेच तर पचविणे कठीण, आणि जो कोणी पचवेल तो सुंदर मनाचा माणूस होईल असे माझे मत आहे.
पु.ल .चे जीवन भाषेचे सौंदर्यनी पु.ल.नी फुलविले आहे .घोड्याला पाण्यापर्यंत नेता येत पण पाणी प्यायचे की नाही हे त्यानेच ठरवायचे असते. पु.ल.नी वाचकांना पाण्यापर्यंत आणले आहे .साहित्य शाळेच्या प्रांगणातील ज्ञानगंगेचे हे अमृतकल प्राशन करायचे क की कोरडे राहायचे हे सारे वाचकांनीच ठरवायचे आहे.
उत्तुंग ध्येयासाठी वेड्या झालेल्या महामानवाला विश्रांती ही तीन अक्षर सापडत नाही त्याला विश्रांती घ्यायला लावण्याचे व आळेबळे थोपटून झोपवण्याचे सामर्थ फक्त एकाच्याच हाती असते त्याचं नाव ‘मृत्यू’.
जळापळी निर्मळ ज्याचे
केले तिथे मिळाली हे
चराचराचे जीवन स्नेहा
सम पाजळले हो
पु.ल. गेले आणि अवघ्या महाराष्ट्राला आपला जणू प्रिय सखाच हरवल्यासारखं वाटलं
जगावे कशासाठी? आणि कसे ?हे शिकवणाऱ्या उत्तुंग प्रतिभेच्या महा वैष्णवाला माझे विनम्र अभिवादन!
अजून बरंच काही ….
- काही वेळा
- माझ्या मुलाकडून मिळालेली शिकवण
- माझ्या आयुष्यातील सुवर्णकाळ
- विश्वास
- कुणाच्या इतक्याही
- संत नामदेव
- अखेरची सोबत
- शिव तांडव स्तोत्र | ( Shiv tandav stotram)
- आशुतोष शशाँक शेखर(शिवस्तुती)| Ashutosh Shashank Shekhar(Shiv Stuti)
- नमामीशमीशान निर्वाणरूपं(Namami Shamishan Nirvanrupam)
- फॅशन
- आजचा युवक आणि माझा दृष्टिकोन
- माघार घेऊ नकोस…
- पु.ल. एक व्यक्तीमत्व
- असं किती दिवस….
- आयुष्याच्या वाटेवर
- कविता
- दिवस
- सांजवेळ
- निसर्ग: आपला मित्र
- वडील एक कृतज्ञ संस्मरण
- आई
- मनुष्य अमर झाला तर
























