संत नामदेव

“आम्ही स्वर्गसुख मानव जैसा एक

देखोनिया सुख पंढरीचे”

पंढरपूरच्या विठ्ठल दर्शनाने मिळणाऱ्या आनंदाचे वर्णन करताना नामदेवांनी हा अभंग रचला आहे .वैकुंठास या कैलासवास याची आपणास गरज नाही एका विठ्ठलाच्या ध्यानामुळे संपत्ती, संतती आणि मान याची त्यांना गरज वाटत नाही. असे प्रत्यक्ष पांडुरंगाला डोलायला लावणारे आणि कीर्तनात त्याला आपल्या समोर नाचणारे भक्त शिरोमणी नामदेव! मराठी भाषेतील आद्य चरित्रकार म्हणून त्यांची कीर्ती अतुलनीय आहे सर्वश्रेष्ठ किर्तनकार !वारकरी संप्रदायाचे पहिले प्रचारक!

समाजात नाना प्रकारच्या विकृती निर्माण होऊन धर्माची जागा बळकवतात . अशावेळी खरा धर्मविचार सांगावा लागतो अशा तऱ्हेने एका बाजूने विषवृक्ष तोडीत जात असताना ,दुसरीकडे कल्पतरूंची लागवड करायची असते. नवसु विचारांच्या वेली त्या कल्पवृक्षावर सोडून द्यायच्या असतात .अधर्माचरणाच्या काळोख्या गुहेत लपून राहिलेले स्वच्छ शुद्ध नीतीतत्त्व उजेडात आणून सर्वांना ज्ञान करून द्यायचे असते हा संतसज्जनांचा धर्म !त्यामुळे समाजाची कितीही तडाखे बसोत नामदेवांनी आपला धर्म कधीही टाकला नाही .जन सामान्यांचा उद्धार व्हावा म्हणून मातेच्या वासल्याने ते कळवळून उपदेश करत राहिले त्यांचा उपदेश सर्वांसाठी होता.

नामदेवांनी अज्ञजनांना सुज्ञ करण्यासाठी प्रथम त्यांना ज्ञानाच्या रस्त्यावरचे धोके स्पष्टपणे दाखवले आहेत .माणसाला जन्ममरणाची चिंता सतत लागून राहिलेली असते म्हणून मुक्तीचे मूळ कारण ‘रामकृष्ण नारायण ‘होत व त्यांच्या भक्तीने भावबंध खुटेल ,जन्ममरणाचा येरझरा तुटेल असे ते कळवळ्याने सांगतात.

“सुटकेचे मूळ जाण |रामकृष्ण नारायण||

येणे तुटे भावबंधन |जन्म एसी सर्वथा||

हा भावबंध तुटेल म्हणून वासनेचा त्याग करावा ,शरीर संपत्तीचा अभिमान टाकावा सर्व ,सुजनलक्षी गोविंदाचे चिंतन करावे.

माणसाला मोहवश करणारे शत्रू फार. शत्रूसुद्धा मोह वश करून माणसाला सन्मार्गावरून च्यूत करतात. मन दुर्वासना ,दुराचार यांच्या आधीन होते ही वस्तुस्थिती असली तरी नामसाधना सच्चेपणाने केली तर यांच्यावर मात करता येते असे आश्वासन नामदेव देतात संसारातील नातीगोती उघड्या डोळ्यांनी ओळखावी.

“पुत्रकमंत्रबंधू माणसी झणी|

न पवती निर्वाणी धावूनिया”|

असा इशारा देऊन ते म्हणतात की, मनुष्य जन्म ही एक रात्रीची वस्ती आहे किंबहुना मनुष्य देहावरचे माणसाचे प्रेम सुटणे हे ब्रह्मसुख प्राप्त होण्यापूर्वीची पहिली प्रधान अट आहे. असे नामदेव सांगतात नामदेवांचे जीवन कार्य यात भक्तीमार्गाच्या प्रचाराशी सर्वस्वी निगडित आहे. म्हणूनच जो देवाला(भक्तीने) अनुसरतो त्याला देव मागे फिरवीत नाही .जसा भाव तसा देव पावतो. आळस टाकून नाम घेणारा वर देव हास्यमुखाने प्रीती करतो .देवाचे पाय बळकट धरावे असे जणु स्वनुभवाचे बोलणे म्हणून त्यांनी सांगितले आहे.

सामान्य संसारी माणसाने संसारातून पळू नये ,घाबरून जाऊ नये ,विठ्ठलाचे पाय धरावे हे सांगितले आहे. संसार करताना केव्हा केव्हा जाती वर्णाचा अहंकार होतो असा अहंकार व्यर्थ आहे कारण,

“जातीच्या आधारे सापडे जरी सार|

तरी का निरहंकार जाले साधू”||

नामदेव सांगतात की ,जीवनातील सर्व गोष्टी नश्वर असतात अंतसमयी काहीही उपयोगी पडत नाही अंत्यसमयी एका विठ्ठलाचे नाम तारक ठरते .पाण्यात असूनही त्याचा स्वतःला स्पर्श न होऊ देणाऱ्या कमलपत्राप्रमाणे प्रत्येक संसारीकाने असावं .प्रपंचातून सोडवणूक करून घ्यावयाचे असेल तर पांडुरंगाला शरण जाण्यावाचून दुसरा उपाय नाही . वासनेची बेडी तोडण्यासाठी श्रीहरीच्या नावाचे घण मनावर घालावे लागतात. असा सुटकेचा मार्ग नामदेवांनी सांगितला आहे.

नामदेवांच्या उपदेशाच्या सीमा केवळ सामान्य माणसापुरत्या सीमित नाही .भक्ती ही अनेकांगी जीवनात अनेकांगी कार्य करत असते. ध्रुव , रावण, उग्रसेन,सुदामा या सर्वांचे सामाजिक स्थान वेगवेगळे या सर्वांचा उद्धार एका भक्तीने कसा झाला याचे सुंदर चित्र नामदेवांनी रेखाटले आहे .फक्त अंतर्यामी निर्मळ भक्ती हवी म्हणजे परमेश्वर कृपा करतोच असा सुपरिचय निष्कर्ष शेवटी त्यात काढला आहे.

“जिथे भक्तीचा जिव्हाळा

तेथ न लगे काही कळा”||

मानवाला भक्तिमार्ग खुला करून देण्याचे कार्य जसे केले तसे साधकाअवस्थेतल्या मानवाला देखील अध्यात्मप्राप्तीच्या सूचना केल्या आहेत. मुमुक्षांना असे सांगितले आहे की “अविद्येला थारा देऊ नका. अविद्येला थारा नसला तर नारायण तुमच्यापाशीच असलेला तुम्हाला आढळेल मुमुक्षाने भजनात गुंतावे व तरुन जावे. विठ्ठल चरण हे श्रेष्ठ तीर्थ आहे .मुमुक्षूला देवासाठी अरण्यवास पत्करण्याची गरज नाही ज्याची चिंतन करावे त्याचे रूप भक्ताला प्राप्त होते भक्तीला त्यांनी एवढी थोरवी प्राप्त करून दिली आहे की त्यापुढे मोक्षपदे सुद्धा तुच्छ वाटवीत

“सोडून पंढरीची वारी|

मोक्ष मागती ते भिकारी”||

अशा शब्दात नामदेवांनी मुमुक्षूंसाठी भक्तीचे महात्म्य उलगडलेले आहे. ज्यांच्या अंत:करणात भक्तीचा ओलावा नसतो त्याची वुत्पत्तीसुद्धा निरर्थकच होय विठ्ठलाचे जे फक्त असतात त्यांच्या पायावर ज्ञान लोळण घेते असा नामदेवांचा स्वानुभव आहे.

ज्यांना धर्माची चाड नसते भक्तीची गोळी त्यांना कळत नाही अशा दृष्ट पण मूड जणांना नामदेव सांगतात ,

“स्वहित कोणते याची जाणीव तुमच्या अंत:करणात नाही. तमोगुणाची साथ धरल्यामुळे तुम्ही रस तळाला गेले आहात “दुर्जनांनी आपली दृष्टता टाकून कसे वागावे याचा उद्देश नामदेवांनी एका अभंगात केला आहे

“पहा परद्वारा जननिये समान|

परदृश्य पाषाण म्हणोनि मानी||

नींदेसी तू मुका होऊनी तत्वतः|

परदेषी तत्त्वत न घाली दृष्टी||

संतसमुदाय मिळती जिथे जिथे|

जावे तेथे तेथे लोटांगणी||

आयुष्य जगण्यासाठी आवश्यक्य असा आदर्श मार्ग नामदेवांनी दुर्जनांना दाखविला आहे एकादशीचे व्रत करावे. पांडुरंगाला तुलसीदल वहावे, स्वधर्म आणि नित्य घ्यावे आणि या सर्वांच्या जोडीला पांडुरंगाला अनन्य भावाने शरण जावे हा एकमेव मार्ग नामदेवांनी सांगितला आहे.

विषयांच्या संगतीत दुर्जनांनी स्वतःचा जन्म व्यर्थ घालवू नये अशी नामदेवांची मनोमन इच्छा आहे ज्याप्रमाणे पायाशिवाय मंदिर शोभत नाही, सुंदर स्त्री पुरुषाशिवाय शोभत नाही, ब्रह्मज्ञान नसेल तर योग्याची साधना सफल होत नाही यास्तव नामदेवांची एकच सांगणे आहे,

“तैसे मनी करा भजन भाव धरा

विषय पसारा टाका वेगी”||

नामदेव हे फक्त आत्मसाक्षारापुरते नव्हते तर त्यांच्या मनात सामान्य जनाविषयी अपार प्रेम भावना होती म्हणून त्यांच्या स्वतःच्या जीवन कर्तव्याचा महत्त्वाचा भाग म्हणून,

“नाचू कीर्तनाचे रंगी|

ज्ञानदीप लावू जगी”||

असे म्हटले आहे संत कसा असावा याबद्दल सांगताना संत नामदेव संताला वृक्षाची उपमा देतात

“जैसा वृक्ष नेणे मान अपमान|

तैसा ते सज्जन वर्तताती||

येऊनिया प्राणी पूजा करिती|

त्यांचे सुख चित्ती तया नाही”||

तुकारामांनी म्हटल्याप्रमाणे ‘बोला तैसे चाले’असे नामदेवांचे आचरण असल्यामुळे आज इतकी वर्ष त्यांची पावले लोक वंचित वंदित आहे.

सामान्यजण ,मुमुक्षु, वाट चुकलेले भोळेजन यांच्यासाठी नामदेवांनी जणु एखादे प्रसिद्ध प्रचार केंद्र स्थापन केले आहे असे म्हणता येईल .त्यांनी सतत आव्हानात्मक अभावात्मक व भावनात्मक स्वरूप पुन्हा पुन्हा सांगून मानवाला अंध:पतनाच्या मार्गावरून न जाण्याचा उपदेश केला .अमृतवाणीहून गोड वाणी मध्ये उपदेश करणारा हा संत या देशाचे एक सुंदर लेणेच होय|

टिपणी करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत