“कगी घुमा के उलटा टोपी टिका के
गॉगल लगाके, आपना कॉलर चढा के
सजधजके घर से टकाटक निकलने का
स्टाईल मे रहने का…..
बिनधास्त ….स्टाईल मे रहने का…..”
ही स्टाईल! ही स्टाईलच आजच्या तरुण पिढीच्या रक्तात भिनली आहे या स्टाईलला खंबीर जोड आहे ती फॅशनची !या फॅशनच्या बाहूपाशात आजची तरुण पिढी विसावली आहे म्हणूनच आजचे युग हे विज्ञान युग नसून फॅशन युग आहे काय असा संभ्रम पडतो
कोणत्या आवडीचा अतिरेक झाला कि तिची वेडात गणना होते. फॅशनचे ही तेच आहे. ‘फॅशन’ या इंग्रजी शब्दाचा साधा सरळ अर्थ आहे ‘पद्धत’ किंवा ‘चालीरीती ‘जशी एखाद्याची बोलण्याची फॅशन एका देश एखाद्या देशातील शिष्टाचाऱ्यांची फॅशन तशी वेशभूषेची फॅशन !परंतु फॅशन या शब्दात कुठेतरी नखरा मिसळला आहे तोच आपल्याला फॅशन कशी असावी आणि कशी नसावी हा विचार करायला लावतो .
विविध परदेशी फॅशनच्या वाहिन्यांच्या प्रक्षेपणामुळे आजच्या तरुणांच्या फॅशनला मोठी चालना मिळाली आहे .या वाहिन्यांवर अभिनय करणाऱ्या कलाकारांच्या विविध फॅशनचे अनुकरण आजच्या तरुण पिढीत सर्रास होत असलेले आपल्याला दिसते .अगदी त्या कलाकारांच्या पायाच्या नखापासून ते डोक्याच्या केसापर्यंत केलेल्या वेगवेगळ्या स्टाईल्स लक्षात ठेवून त्याचे अनुकरण करण्यात आजची पिढीचा चाणाक्ष असलेली आपल्याला दिसून येते मग नकळत आपल्याला प्रश्न पडतो फॅशन आपल्यासाठी की आपण फॅशन साठी !
जाहिराती !जाहिराती ह्या तर फॅशनला खतपाणीच घालत असल्याचे आपल्याला दिसून येते कोणती क्रीम किंवा पावडर लावल्याने कोणता साबण वापरल्याने आपली त्वचा तजेलदार तसेच सुंदर दिसेल हा निर्णय आजच्या युवक जाहिरातीवरून ठरवतात .कोणती गाडी आपल्या फॅशनला सूट होईल हे युवक जाहिरातीवरून ठरवतात. फॅशनचा मॉडेलिंग क्षेत्रावर असलेला प्रभाव आणि या व्यवसायात मिळणारा भरपूर पैसा व प्रतिष्ठा ही आजच्या तरुण पिढीला भुरळ पडते त्यामुळे अनेक युवकांना त्यांचे प्रलोभन निर्माण होते व कमी कष्टात भरपूर पैसा मिळवण्याचे साधन निर्माण होते .
नीटनेटकी राहणी ,आकर्षक कपडे या गोष्टी माणसाच्या व्यक्तिमत्त्वाला उठाव आणत असतात “A thing of beauty is joy for ever” हे एक सार्थ साधन आहे .आरोग्य संपन्न शरीर स्वच्छतेच्या सवयी नियमित आहार विहार एवढे असेल तर फॅशन वाचूनही माणूस आकर्षक व सुंदर दिसतो .फॅशन मुळे तरुणाची अनेक गोष्टीकडे दुर्लक्ष होते .वेळेचा तसेच पैशाचाही मोठ्या प्रमाणावर अपव्यय होताना आपल्याला दिसतो .तरीही फॅशन ही अनुकरणातून एखाद्या संसर्गजन्य रोगासारखी पसरत आहे काही वेळा फॅशनचे इतके अंधानूकरण केले जाते की संस्कार ,सभ्या- सभ्यता याचे अवधान सुटतेच पण ही फॅशन आपले रंग, रूप ,वय ,पेशा याला शोधणारी आहे की नाही याचाही विचार केला जात नाही .मग फॅशन सौंदर्यात भरण्यासाठी आहे की विचित्र दिसण्यासाठी आहे हेच कळत नाही .
फॅशन कालचक्र बरोबर सतत फिरत असते म्हणूनच ती सारखी बदलत असते परंतु हे वर्तुळ फिरून फिरून फिरणार किती? तिथेही पुनरावृत्ती दिसते एखाद्या फॅशनचा इतका कंटाळा येतो की त्याच्याविरुद्ध टोकाची फॅशन सुरू होते .
तरुण आणि तरुणी यांच्या फॅशनमध्ये निश्चितच वेगळेपणा हवा नाहीतर अलीकडे मुलींनी मुलांचे कपडे घालणे, मुलांनी केस वाढवून त्याची पोनी बांधणे. ठिगळ लावलेली कपडे घालणे ,याउलट आपल्या देशातील वातावरण आपली संस्कृती लक्षात घेऊन फॅशन करणे योग्य ठरते. फॅशन या सुंदर असल्या तरी काही फॅशन शरीराला घातक ठरतात. तोकडे कपडे ,अंगावर केलेले रंग काम, तसेच युवतींचे वारंवार ब्युटी पार्लरमध्ये जाणे ह्या गोष्टी आरोग्याच्या दृष्टीने विघातक आहेत.
शेवटी काय तर फॅशनचा अति मोह न धरता युवक युवतींनी समाज उभारणीची कामाकडे वळणे गरजेचे आहे .कारण माणसाचे खरे स्वरूप हे त्याच्या कृतीतून प्रकट होते. शरीर नाचवण्याबरोबर मनही सजवता आले पाहिजे .तनही सुंदर ,मनही सुंदर अशी व्यक्ती कोणाला आवडणार नाही
म्हणूनच तर शरीर सजवता सजवता ‘चातुर्य शृंगारे अंतर…… हे रामदासाचे वचनही लक्षात ठेवावे.
तुमच्यासाठी अजूनही बरेच काही….






