माझ्या आयुष्यातील सुवर्णकाळ
त्या दिवशी 20 जून ही तारीख होती .अजून दोन दिवसांनी अर्जुनच्या वयाला 30 वर्षे पूर्ण होणार होती. जीवनाच्या त्या नव्या दशकामध्ये पदार्पण करताना त्याच्या आयुष्यातील सुवर्णकाळ मागे पडणार अशी एक अनामिक भीती व हुरहूर त्याच्या मनी दाटून येत होती .
रोज ऑफिसला जाण्याआधी व्यायाम शाळेत म्हणजे जिमला जाऊन व्यायाम करण्याचा त्याचा दैनंदिन कार्यक्रम असे. त्याचा मित्र सचिन रोज सकाळी व्यायाम शाळेत त्याला भेटत असे .एकोणऐंशी वर्षाचं वय असूनही त्याची शरीरयष्टी हेवा वाटण्यासारखी होती .रोजच्या शिरस्त्यानुसार सचिनला त्या दिवशी भेटल्यावर त्यांनी नेहमीप्रमाणे सुप्रभात म्हणून अभिवादन केले. पण त्याच्या मनात नेहमी आढळणारा उत्साह त्याला त्या दिवशी मात्र आढळला नव्हता. त्याचं काही बिनसलं होतं का अशी सचिनने त्याला विचारणा केली .वयाची तिशी पूर्ण करणार असल्यामुळे अर्जुन थोडा अस्वस्थ झाला होता, असं त्यांनी सचिनला सांगितलं. सचिनच्या वयाचा झाल्यावर तो त्याच्या गतआयुष्याकडे कशा नजरेने बघेन असा विचार त्याच्या मनात चमकून गेला आणि लगेचच त्याने सचिनला प्रश्न केला ,”मला एक सांग, की आत्तापर्यंत तुझ्या जीवनातला सर्वात सुंदर काळ कोणता होता?”
अजिबात आढेवेढे न घेता सचिनने उत्तर दिलं, “ऐक तर मग अर्जुन ,तुझ्या वैचारिक प्रश्नाला माझे हे वैचारिक उत्तर.”
माझं बालपण खेडेगावात गेलं. त्या काळात माझी उत्कृष्ट काळजी घेतली गेली होती. माझ्या आई-वडिलांना माझं उत्तम संगोपन करून मला वाढवलं. माझ्या दृष्टीने आयुष्यामध्ये माझा तो सर्वोत्तम काळ होता. “जेव्हा मी शाळेत जाऊ लागलो व रोज नव्या नव्या गोष्टी शिकून मोठा होत होतो; तेव्हा मला वाटतं की ,तो माझ्या जीवनातील सर्वात छान काळ होता.
जेव्हा मला पहिली नोकरी लागली, माझ्यावर जबाबदारी पडू लागली व त्या कष्टाची मला पैसे मिळू लागले, तो माझ्या आयुष्याचा फारच उत्तम काळ होता.
जेव्हा माझ्या होणाऱ्या पत्नीस मी प्रथम भेटलो ,तिच्या प्रेमात पडलो, तो तर माझ्या जीवनातला विलक्षण आनंदमयी काळ होता .
माझ्या कठीण प्रसंगी व अडचणीच्या काळी मी व माझी पत्नी जेव्हा एकत्र होतो माझी नोकरी गेल्यावर मला अनेक अडचणींना तोंड द्यावे लागले ,पण आम्ही त्या काळात एकत्र घालविले ते दिवस म्हणजे माझ्या जीवनातील सर्वात सुखद काळ होता .अखेर मला पुन्हा नोकरी मिळाली व एकदा नव्याने आयुष्य जगण्याची मी सुरुवात केली आणि स्वतःला अपत्य होण्याची स्वप्न पाहिलेल्या तो काळ आयुष्यातील ती उत्तम काळ होता.
पिता होण्याचा आनंद अनुभवत ,जेव्हा मी आमची मुले लहानाची मोठी होत असताना व्यतीत केलेला, तो माझ्या आयुष्यातील आनंदाचा असा काळ होता .
“अर्जुन आज मी एकोणऐंशी वर्षाचा झालो आहे .अजूनही माझी तब्येत चांगली ठणठणीत आहे .मी खूप आनंदात आहे आणि आजही माझ्या लाडक्या पत्नीवर माझं तेवढच प्रेम आहे .अगदी आमच्या प्रथम भेटीत जेवढं प्रेम जडलं होतं ते तसंच आबाधित आहे .माझ्या आयुष्यातील हाच काळ सर्वात अप्रतिम असा काळ आहे .”
तात्पर्य हेच की उगवलेल्या दिवसा इतकं असं दुसरं काहीही महत्त्वाचं व आनंदमय नसतं.


