काही वेळा
काही वेळा असं असतं
बोलायचं खूप …..
पण सांगायचं नसतं
डोळे मिटून रात्रभर
चक्क जगायचं असतं
सत्य समोर येण्याआधी
आपलं मत मांडायच नसतं
दुसऱ्यावरच्या खात्रीनं
तिसऱ्यासाठी भांडायचं नसतं
स्वतःला हुशार समजणारा
ओळखायलाच फसतो
आपला आपला वाटतो
तो ओळखीचाही नसतो
जखम भरतेच आपोआप
आपण बांधायची नसते
खपली सुकतेच आपोआप
आपण काढायची नसते

