दिवस इवल्याशा पक्षासारखे असतात
भुर्रकन उडून जातात
आणि मागे ठेवतात आठवणींची पिसे
काही पांढरी काही काळी
काही मऊ काही रखरखीत
आपण जमतील तेवढी पिसे गोळा करायची
त्यांना नीट गुंफून बनवायची
एक आठवणीची चटई
आयुष्याच्या संध्याकाळी निवांत पडण्यासाठी
अजूनही बरच काही……
दिवस






